Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव पोलिस पाटील भरती 2023

 जळगाव पोलिस पाटील भरती 2023

जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयांतर्गत पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून ३१ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत.


विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून अधिकृत‌ पध्दतीने मागविण्यात येणार  आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात १८ जुलै पासून सुरुवात झालेली  असून. इतर माहिती खालील प्रमाणे आहे.

रिक्त पदांचा तपशिल

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील पोलीस पाटील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. जळगाव – ४२, एरंडोल -‌६६, पाचोरा – ३६, चाळीसगाव – ४१, अमळनेर – ८०, फैजपूर – ४३ भुसावळ – ३६ असे रिक्त पदे आहेत.

भरती बाबत नियम आणि अधिकार

भरती प्रक्रिया/परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अशंत बदल करणे पदांच्या एकूण व गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबधित उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी यांना राहतील व तसा निर्णय अंतिम असेल असे. आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे‌.

माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement