लाडक्या बहिणींना आता गॅस सिलिंडरही मिळणार मोफत, लवकरच अंमलबजावणी सुरु
👧 माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. महिलांसाठी हा मोठा दिलासा असून, आता सरकारने त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. महिलांसाठी दरमहा 1500 रुपयांची योजनेबरोबरच महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारने उघडली तिजोरी, महिलांना दरमहा मिळतील 1500 रुपये
महिलांना कसा मिळणार लाभ
🧯 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला १५०० रुपयांसह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मिळणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून त्याचा शासकीय आदेश (GR) काढला जाणार असून अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्नगट आणि अत्यल्प उत्पन्न गट यांना तीन सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. याआधी फक्त उज्वला योजनेतील महिलांना सदर सबसिडीचा लाभ हा मिळत होता पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांनाही समाविष्ट करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन उपक्रमांतर्गत या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत.
⛽ तीन सिलेंडर मोफत कसे मिळणार?
उज्ज्वला योजनेतील महिलांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडरमागे 300 रुपये अनुदान देते, एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत 830 रुपये धरुन प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे तीन सिलेंडर मोफत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, व आता लवकरच त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
मोफत टॅबलेट योजना! 10 वी पास विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट योजना 2024
💁♀️ कोणाला मिळणार लाभ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कटुंबात एका रेशनकार्डवर कितीही महिलांची नोंद असली तरी घरातील फक्त एकच महिलेला वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहे. गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलिंडरचे पैसे दिले जातील आणि प्रत्येक लाभार्थीचे आधार कार्ड लिंक केले जाईल. सुमारे 2.5 कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील, असा सरकारचा अंदाज आहे, परंतु केवळ 1.5 कोटी कुटुंबांनाच मोफत गॅस सिलिंडरचा लाभ मिळेल. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर चार ते साडेचार हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे.
💓माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत👫 पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला 💬जॉईन व्हा.

0 टिप्पण्या