Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणासाठी पोलिस पाटील यांच्याकडील नोंदवह्याची तपासणी

 मराठा आरक्षणासाठी पोलिस पाटील यांच्याकडील  नोंदवह्याची तपासणी


    नांदेड जिल्हातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी प्रमाणपत्र नोंदीबाबत गावातील जुन्या पोलिस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे गाव नमुना क्रमांक १४ (जन्म मृत्यू नोंदवह्या) उपलब्ध असतील तर त्यांनी अशा नोंदवह्या संबंधित तालुक्याचे तहसिल कार्यालयात रितसर जमा कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

    पोलिस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे जन्म-मृत्यू नोंदवह्या असल्यास तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन



    मराठा समाजातील व्यक्तींना, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेवून कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्राच्या अनुषंगाने १९६७ पूर्वी कार्यरत पोलिस पाटील यांचेकडील गाव नमुना क्रमांक १४ (जन्म-मृत्यू नोंदवह्या) मध्ये कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा जात नोंदी आढळण्याची शक्यता आहे त्यामुळे जुने पोलिस पाटील किंवा त्यांच्या वारसांनी अशा नोंदवह्या उपलब्ध असल्यास जमा कराव्यात, असे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

  
    माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement