Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र सरकारने उघडली तिजोरी, महिलांना दरमहा मिळतील 1500 रुपये

महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी मोठी भेट, महिलांना दरमहा मिळतील 1500 रुपये

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या धर्तीवर महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे , मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करुन महिलांना १५०० रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ २१ ते ६० वयोगटातील महिलांना मिळणार आहे. यात महिलांना दरमहा  १५००  रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांचे वार्षिक बजेट निश्चित करण्यात आले आहे. सदर योजनेसाठी अधिक जाणून घेण्यासाठी लेख पुर्ण वाचा यात तुम्हाला सदर योजनेसाठीची पात्रता, अपात्रता, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची सुरुवात आणि शेवटची तारीख आणि हफ्ता केव्हा मिळेल याबाबत सविस्तर माहिती मिळेल लेख पूर्ण वाचा व अशाच नवनवीन रोजगारआणि सरकारी योजनांविषयी माहितीसाठी आमच्या वेबसाइट jobandschemes.blogspot.com ला भेट द्या व आमच्या या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता.


Maharashtra government has opened the treasury, women will get Rs 1500 per month

वर्षाला 3 गँस सिलेंडर मोफत काय आहे योजना

एकनाथ शिंदे सरकारने हा निर्णय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतला आहे, त्यामुळे आगामी होणा-या निवडणुकीसाठी सदर योजना ही लागू करण्यात आलेली आहे यात महिलांना निवडणुकीपुर्वी ही भेट देण्यात आलेली आहे. आणखी एक कल्याणकारी योजना जाहीर करताना, प्रत्येक वर्षी पाच सदस्यांच्या कुटुंबाला तीन सिलिंडर मोफत मिळणार असल्याचे सांगितले आहे.  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे नाव देऊन एकनाथ शिंदे सरकारने ही योजना देखील बजेट मध्ये जाहिर केली आहे.


शेतक-यांना मदतीचा हात ४४ लाख शेतक-यांना होणार फायदा


 शेतकऱ्यांना मदतीचा हात देत थकबाकीदार शेतक-यांचे वीजबिल माफ करण्याची घोषणा केली असून, याचा फायदा ४४ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पातून काही कल्याणकारी योजना जाहीर होतील, अशी अपेक्षा होती, कारण येत्या काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत, अशी चर्चा होती ती एकनाथ शिंदे सरकारने आपल्या अर्थसंकल्पात प्रत्यक्षात करून दाखवून दिली आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणाला मिळणार ३ गँस सिलेंडर मोफत जाणून घ्या


राज्यात दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अजित पवार यांनी केली आहे शुक्रवारी या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली ज्याअंतर्गत पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत सर्व घरांना ३ गँस सिलिंडर मोफत देणार आहोत, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी आर्थिक मदतीचाही समावेश करण्यात आला आहे, अशी घोषणा त्यांनी केली. याअंतर्गत सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार असून ही योजना जुलै २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे.या अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना या योजनेसाठी वार्षिक बजेटमध्ये तरतूद करण्यात येणार आहे यासाठी ४६ हजार कोटी रुपयांचे बजेट हे ठेवण्यात आले आहे.

मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी लिंक- लिंक


Maharashtra government has opened the treasury, women will get Rs 1500 per month



मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणा-या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्रता

  • ज्यांच्या कुटूंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
  • ज्यांच्या कुटूंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटूंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार  आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणा-या आर्थिक योजनेद्वारे रु. १,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • ज्यांच्या कुटूंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटूंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड काँर्पोरेशन /बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्या कुटंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रक्टॅर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धती-

  • योजनेच्या लाभासाठी आँनलाईन अर्ज करावयाचा असून त्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता ही करावयाची आहे.
  • रेशनकार्ड आणि आधारकार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटूंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपर्यंत असणे अनिवार्य
  • बँकचे पासबुक
  • सदर योजनेचे हमीपत्र

सदर योजनेसाठी अर्ज करायची तारीख आणि अंतिम मुदत-

अ.क्र.

उपक्रम अंमलबजावणी

वेळेची मर्यादा

अर्जाची सुरुवात

१ जुलै २०२४

अर्जाची शेवटची तारीख

१५ जुलै २०२४

तात्पुरती यादी प्रकाशन

१६ जुलै २०२४

तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त करणे

१६ जुलै ते २० जुलै २०२४

तक्रार किंवा हरकतीचे निराकरण

२१ जुलै ते ३० जुलै २०२४

अंतिम यादी प्रकाशन

१ आँगस्ट २०२४

लाभार्थ्यांचे बँकेमध्ये E-Kyc करणे

१० आँगस्ट २०२४

लाभार्थी निधी हस्तांतरण

१४ आँगस्ट २०२४

दरमहिना देय दिनांक

दर महिना १५ तारखेपर्यंत



💓माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत👫 पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला 💬जॉईन व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement